RTE Admission 2025-26 Maharashtra: RTE 25% प्रवेश कधी सुरू होणार?
📘 RTE Admission 2025-26 Maharashtra संपूर्ण माहिती
महाराष्ट्र शासनाच्या RTE (Right to Education Act) 25% कोटा अंतर्गत गरीब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो.
पालकांना आता RTE Admission 2025-26 कधी सुरू होणार? याची उत्सुकता आहे. आणि हेच आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत. RTE ची संपूर्ण प्रोसेस या लेख मध्ये दिली जाणार आहे सर्व माहिती आपण पाहणार आहोत .
🎓 RTE 25% अंतर्गत कोण पात्र आहे?
✔️ वय मर्यादा (प्रवेशासाठी):
-
नर्सरी / KG / 1ली : शासन नियमांनुसार
✔️ वार्षिक उत्पन्न:
-
₹1,00,000 ते ₹3,50,000 (क्षेत्रानुसार)
✔️ प्रवर्ग:
-
SC / ST
-
OBC / VJNT
-
अल्पसंख्याक
-
BPL / आर्थिक दुर्बल घटक (EWS)
📝 RTE Admission 2025-26 साठी आवश्यक कागदपत्रे
-
आधार कार्ड (विद्यार्थी व पालक)
-
उत्पन्न प्रमाणपत्र
-
जातीचा दाखला (लागू असल्यास)
-
रहिवासी प्रमाणपत्र
-
जन्म प्रमाणपत्र
-
पासपोर्ट साईज फोटो.
📅 RTE Admission 2025-26 कधी सुरू होणार?
👉 मागील वर्षांच्या वेळापत्रकानुसार,
RTE Admission प्रक्रिया जानेवारी ते फेब्रुवारी 2025 दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे.
⚠️ अधिकृत तारीख शिक्षण विभागाच्या rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाहीर केली जाईल.
💻 RTE Admission अर्ज कसा करायचा?
1️⃣ अधिकृत वेबसाईट उघडा
👉 rte25admission.maharashtra.gov.in
2️⃣ New Registration करा
3️⃣ विद्यार्थी माहिती भरा
4️⃣ शाळांची निवड करा
5️⃣ अर्ज Submit करा
6️⃣ Lottery Result पाहा
या स्टेप ला फोलो करून आपला अर्ज भरून घ्या अर्ज काळजी पूर्वक भरावा माहिती भरण्यात काही चूक झाली तर अर्ज रद्द होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे अर्ज भरताना काळजीपूर्वक भरावा व अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.
🎯 RTE Lottery Selection Process 📌
RTE प्रवेश Lottery पद्धतीने दिला जातो 📌 नाव लागल्यास संबंधित शाळेत जाऊन कागदपत्रे सादर करावी लागतात.
📢 महत्वाची सूचना
RTE Admission 2025-26 संदर्भातील अधिकृत अपडेटसाठी वेबसाईट नियमित तपासा.
👉 RTE Admission 2025-26 अपडेटसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा
RTE 25% बद्दल माहिती
RTE कायदा 2009 अंतर्गत शिक्षण हा मुलांचा मूलभूत हक्क आहे, अशी स्पष्ट भूमिका भारत सरकारने घेतली आहे. महाराष्ट्र शासनानेही हा कायदा काटेकोरपणे राबवण्याची भूमिका घेतलेली आहे.
🏛️ केंद्र शासनाची भूमिका
✔️ 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे
✔️ खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25% जागा गरीब व वंचित घटकांसाठी राखीव
✔️ शिक्षणात समान संधी (Education for All)
✔️ शाळा, शिक्षक, पायाभूत सुविधा यांचे निकष ठरवणे
🏫 महाराष्ट्र शासनाची भूमिका
महाराष्ट्र शासनाने RTE 25% प्रवेश योजना सक्रियपणे राबवली आहे.
🔹 शासनाची मुख्य भूमिका:
-
ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (Lottery System) सुरू केली
-
गरीब, SC/ST/OBC/EWS/BPL मुलांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश
-
शाळांना दिलेल्या प्रवेशाची फी परतफेड शासनाकडून
-
पालकांसाठी rte25admission.maharashtra.gov.in पोर्टल
👉 शिक्षण हे हक्क आहे, सवलत नाही — हीच शासनाची मूळ भूमिका आहे.


Comments
Post a Comment