![]() |
| RESHAN CARD |
महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडून नागरिकांना
त्यांच्या उत्पन्नानुसार वेगवेगळ्या रंगांची रेशन कार्ड (शिधापत्रिका) दिली जातात.
शिधापत्रिका चे तीन प्रकार आहेत, ते पुढील प्रमाणे केशरी, पिवळे, पांढरे, इत्यादी. यापैकी
पांढरे रेशन कार्ड हे आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबांसाठी जारी केले
जाते.
पांढरे रेशन कार्ड म्हणजे काय? पांढरे रेशन कार्ड अशा कुटुंबांना दिले जाते ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. या कार्डवर शासनाकडून कोणतेही सवलतीचे धान्य (गहू, तांदूळ, साखर इ.) मिळत नाही. तरीही, हे कार्ड एक अत्यंत महत्त्वाचा अधिकृत पुरावा म्हणून काम करते. याकार्ड चा उपयोग रहिवासी दाखला म्हणून किवा विद्यार्थी साठी लागणारे पुरावे या करिता वापर केला जातो, तसेच या कार्ड चा उपयोग सर्व लाभार्थी ने घेणे गरजेचे आहे. भविष्यात रेशन कार्ड हा पुरावा खूप महत्वाचा राहणार आहे. शासनाच्या नवीन GR नुसार पांढरे रेशन कार्ड धारकांना सुद्धा रु.५ लाख पर्यंत चा विमा प्रत्येक कुटुंब प्रमाणे दिला जातो.
पांढऱ्या रेशन कार्डचे मुख्य फायदे
1. ओळख
आणि पत्त्याचा पुरावा: शासकीय
आणि निमशासकीय कामांसाठी हा एक भक्कम रहिवासी पुरावा मानला जातो.
2. पासपोर्ट
काढण्यासाठी: नवीन
पासपोर्टसाठी अर्ज करताना पत्त्याचा पुरावा म्हणून हे कार्ड ग्राह्य धरले जाते.
3. बँक
खाती आणि कर्ज: बँकेत
नवीन खाते उघडताना किंवा गृहकर्ज/वाहन कर्ज घेताना कागदपत्र म्हणून याचा उपयोग
होतो.
4. इतर
शासकीय कागदपत्रे: पॅन
कार्ड, मतदान ओळखपत्र, किंवा
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरते.
5. गॅस कनेक्शन: नवीन एलपीजी (LPG) गॅस कनेक्शन घेण्यासाठी पांढरे रेशन कार्ड वापरले जाऊ शकते.
पांढरे रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक पात्रता
1. कुटुंबातील सर्व सदस्यांचे मिळून वार्षिक उत्पन्न १ लाख
रुपयांपेक्षा अधिक असावे.
2. कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन (टॅक्सी वगळून) असण्याची
शक्यता असते.
3. कुटुंबातील सदस्य आयकर (Income Tax) भरणारे असू शकतात.
आवश्यक कागदपत्रांची यादी
1. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
2. उत्पन्नाचा दाखला / १६ नंबर फॉर्म / वेतन पत्रक / इन्कमटॅक्स पावती (यापैकी एक)
3. कुटुंबाच्या प्रमुखाचे २ पासपोर्ट साईझ फोटो
4. रहिवासी पुरावा (लाईट बिल, पाणी पट्टी, किंवा गॅस पावती पीटीआर भाडे पत्रक)
5. पॅन कार्ड (असल्यास)
6. जुने रेशन कार्ड (रेशन कार्ड विभक्त करायचे असल्यास)
7. मतदान कार्ड झेरॉक्स.
अर्ज कसा करावा?
पांढऱ्या रेशन कार्डसाठी तुम्ही जवळच्या तहसील कार्यालयात (पुरवठा विभाग) किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन ऑफलाइन अर्ज करू शकता. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाइटवरून (rcms.mahafood.gov.in) ऑनलाइन प्रक्रियेद्वारेही अर्ज सादर करता येतो. विहित नमुन्यातील अर्ज भरून त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडाव्या लागतात. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नवीन कार्ड वितरित केले जाते.

0 Comments